योजनेअंतर्गत ३ लाख ५० हजार मर्यादेत अर्थसहाय्य
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यासाठी रुपये 3 लाख 50 हजार मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येते. ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
या योजनेसाठी स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3 लाख 50 लाख हजार राहील. प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के (कमाल रुपये 3 लाख 15 हजार ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल. योजनेअंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे (दूरध्वनी क्र. ०२०-२९७०६६११) येथे सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.