Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा

धमकी दिल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संबंधित नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिस्पर्धी टोळीतील एकाच्या खूनाचा डाव उधळला – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या राहत्या जागेवरून चुलत भावांशी मालमत्तेचा वाद सुरू आहे. या वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने ‘स्टॉप वर्क’ नोटीस दिली होती. त्यानंतरही तेथे बांधकाम सुरूच असल्याने तक्रारदार या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी कुटुंबियांसह पोलिस ठाण्यात गेले होते. दरम्यान, तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे आले.

त्यांनी चाकणकर यांच्याशी वाद घालत, ‘माझ्या कार्यकर्त्यांचे काम थांबवतोस का? तुझे घरही पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच, नगरसेवकाने आपल्या चालकाला ‘बांबू काढ’ असे सांगत मारहाणीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×