Breking News
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनपुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडूबारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभबारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची द्वितीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया पूर्ण

पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार, टोळके ताब्यात

पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार, टोळके ताब्यात

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पोलिसांनी घेतले पाच जणांना ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, १७ वर्षीय मुलावर गोळीबार केल्यानंतर दहशत माजविण्यासाठी हवेत देखील गोळीबार करण्यात आला. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या या सर्व अल्पवयीन मुलांना पकडले आहे.

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी – सविस्तर बातमी 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पाच जणांना ताब्यात घेतले आहेत. याबाबत १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास चरवडवस्ती येथील मैदानावर घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी अल्पवयीन असले तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जखमी मुलावर तीन गुन्हे नोंद आहेत. तर, आरोपींमधील काहींवर पहिले गुन्हे आहेत. दरम्यान, यातील दोन्ही मुलांच्या वडगाव बुद्रुक परिसरात स्वतंत्र टोळ्या (गट) आहेत. त्यामुळे त्यांच्यात वादविवाद असतात. काही महिन्यांपुर्वी त्यांच्यात वाद झाले होते.

या वादातूनच पाच जणांनी चरवडवस्ती येथील मोकळ्या मैदानावर मुलगा मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांना थांबविले. शिवीगाळकरत तुमचा विषयच संपवतो, असे म्हणत लोखंडी हत्याराने वार केले. त्यानंतर यातील एकाने थेट पिस्तूल काढून या मुलावर गोळी झाडली. गोळी मुलाच्या मांडीत लागली. तो गंभीर जखमी झाला. तो कोसळल्यानंतर या भागात दहशत माजविण्यासाठी या टोळक्याने हवेत देखील गोळीबार केला. त्यानंतर टोळके पसार झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी पसार झालेल्या मुलांचा शोध सुरू केला. त्यांना बुधवारी रात्री पकडण्यात आले. त्यांनी हे पिस्तूल कोणाकडून आणले, त्याचा आणखी कुठे वापर केला आहे का, यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनायक पाटणकर, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×