सम्राट गार्डनजवळील घटना
marathinews24.com
पुणे – दोन अल्पवयीन टोळक्यात झालेल्या वादानंतर गुरूवारी मध्यरात्री एका अल्पवयीनाने गावठी बंदुकीतून हवेत फायरिंग केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. फायरिंगपूर्वी या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.
कुख्यात घायवळचा साथीदार बनला गांजा तस्कर – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील सम्राट गार्डनच्या नवीन उड्डाण पुलाजवळ गुरूवारी (दि. १६) मध्यरात्रीच्या सुमारास काही अल्पवयीन मुले स्त्याच्या कडेला बोलत थांबले होते. त्यावेळी दुसऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीने तेथे जात ‘तूच काल माझ्यासोबत भांडला होता’ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. झटपटीत एकाने गावठी बंदूक काढून हवेत फायरिंग केले. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळावरून पोलिसांना काडतूस मिळून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, अद्याप एक अल्पवयीन फरार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.



















