Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

आमदार नमिता मुंदडा यांनी केले घुले कुटुंबीयांचे सांत्वन

आमदार नमिता मुंदडा यांनी केले घुले कुटुंबीयांचे सांत्वन

निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुरवणी जबाबात सौरव सोनवणे यांचे आल्याने राजकीय वर्तुळातातील पुढाऱ्याची एका मेकांवर चांगलीच टीकेची झोड उठल्यामुळे चर्चांना उधाण आले असून जिल्हाभरात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी एसआयटी पथकाकडून तपासाला गती मिळालेली पाहायला मिळत आहे. माजी खासदार डॉ प्रितमताई मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घुले कुटूंबियांची भेट घेऊन धीर दिला आहे. दरम्यान, केज मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुदंडा यांनी शनिवारी (दि.२७) थेट टाकळी येथे जाऊन स्व. विलास घुले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

टीईटी पेपर फुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – सविस्तर बातमी 

आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत झालेल्या हत्या प्रकरणाची माहिती घेतली. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर दिला. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुंदडा यांनी पीडित घुले कुटुंबीयांना दिले. विलास घुले प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांकडून कुटुंबीयांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली जात आहे. यावेळी उपस्थित युवा नेते अक्षय मुंदडा, राहूल गदळे, विष्णू घुले यांच्यासह गावातील ग्रामस्थ व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×