शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
marathinews24.com
पिंपरी – भारतीय जनता पक्षाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. भेटीगाठी, सोसायट्यांमधील नागरिकांच्या प्रश्नांवर संवाद या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देत असतानाच दुसरीकडे पक्षप्रवेशही करून घेतले जात आहेत. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी उपशहर संघटक रजनी रघुनाथ वाघ आणि शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत – सविस्तर बातमी
आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सरसावलेले आहेत. महापालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने शांत, संयमी आणि उच्चशिक्षित चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या आमदार जगताप यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. तीस लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील मतदारांसमोर भाजपने पिंपरी चिंचवड शहरासाठी जगताप यांना निवडणुकीची कमान सोपवली आहे. आमदार जगताप यांनी बैठका, पदाधिकाऱ्यांची चर्चा, गृहनिर्माण संस्था तसेच सोसायट्यांमध्ये संवाद मेळावे यावर भर दिला आहे . इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
उबाठा गटाला धक्का!
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची कमान सांभाळताच आमदार जगताप यांनी शिवसेना उबाठा गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी उपशहर संघटक रजनी रघुनाथ वाघ आणि शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रभाग क्रमांक १७ मधील आजी माजी पदाधिकारी तसेच भाजपचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
यांनी केला पक्षप्रवेश!
सुरेखा वाघ, मंदाकिनी वाघ, सारिका बागुल, रवींद्र पाटील, वंदना पाटील, रमेश भदाणे, सुनंदा भदाणे, रमेश बिरारी, प्रदीप भदाणे ,रामेश्वर ईशी, नितीन पाटील ज्ञानेश्वर महाजन, विठोबा महाजन, पल्लवी वाघ, रवींद्र महाजन, नितीन महाजन, भाऊसाहेब महाजन, भाऊसाहेब पेंटर, प्रशांत अहिरे,युवराज अहिरे , आशा अहिरे, पूजा अहिरे, वाल्मीक पाटील, गायत्री पाटील, रवींद्र जगताप, आर के महाजन, योगेश माळी यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर मेट्रो रस्त्यांचे प्रशस्त जाळे, सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय, नवनवीन प्रकल्प यामधून शहराचा कायापालट झालेला सर्व नागरिकांनी पाहिला आहे. येथील नागरिकांचा भाजपला पाठिंबा आहे. आगामी काळात शहर भाजपच्या माध्यमातून शहराचा विकास होणार आहे. म्हणून कार्यकर्त्यांची मागणी, पदाधिकाऱ्यांचा आग्रह यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे रजनी वाघ यांनी सांगितले.
भाजपने शहराच्या निवडणूक प्रमुख म्हणून शहराची जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पार पाडण्यात येईल. नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झाली. भाजपामध्ये येण्यास शहरातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार भाजपकडे आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर ही निवडणूक नक्कीच यशस्वी होणार आहे. या निवडणुकीत महापौर हा भाजपचाच असेल असा विश्वास आहे.
शंकर जगताप निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड शहर.























