Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाची चार तास चौकशी

खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाची चार तास चौकशी

सौरव सोनवणे यांच्याकडे एसआयटीकडून विचारपूस

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. शनिवारी (दि. २७) सौरव सोनवणे यांचा एस आय टी पथकाकडून जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याची तब्बल चार तास चौकशी सुरू होती. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस व्यंकटराम खाझड यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकरणाचा तपास पूर्ण गतीने सुरू आहे. पोलीस सर्व प्रकारचे डिजिटल पुरावे आणि तांत्रिक डेटा गोळा करत असल्याने सांगितले.

आमदार नमिता मुंदडा यांनी केले घुले कुटुंबीयांचे सांत्वन – सविस्तर बातमी 

मुख्य आरोपीला आधीच ताब्यात घेण्यात आले असून, तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले कपडे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सौरव सोनवणे यांच्या चौकशीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘नोटीस बजावल्यानंतर सौरव सोनवणे चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तपासाशी संबंधित आणि त्यांच्या बाजूने सांगण्यात आलेल्या सर्व लिंक्स आणि मुद्द्यांबाबत सविस्तर प्रश्न विचारून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. तपासात एका ‘थार’ गाडीचा (क्रमांक 166) उल्लेख समोर आला आहे. ही गाडी घटनेच्या वेळी नेमकी कुठे होती, तिचा मार्ग काय होता आणि संशयितांचे टायमिंग काय होते, या सर्व तांत्रिक बाबींची पडताळणी सध्या पोलीस करत आहेत. या तांत्रिक आणि डिजिटल तपासातून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एस आयटी प्रमुख व्यंकटराम खाझड यांनी सांगितले आहे.

पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर काय म्हणाले रमेश घुले

विलास घुले हत्या प्रकरणी त्यांचे बंधू रमेश घुले व कुटुंबियांनी शनिवारी संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात पत्रकारांशी बोलतांना रमेश घुले म्हणाले की, पोलीस अधीक्षकांना या प्रकरणातील काही माहिती आणि पुरावे सांगितले, आमच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे, आम्ही शस्त्रधारी पोलीस संरक्षण मागितलेले आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड याचे घर हे कारखान्यापासून १०० मीटर अंतरावर आहे, तिथुनच हा कट शिजला.

या संदर्भातील माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. तसेच स्वतःवर आणि फिर्यादी उमेश माने यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय माझ्यासह कुटुंबियांना सातत्याने धमक्या येत असून त्यापार्श्वभूमीवर पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान मारहाण करणारे बजरंग बप्पांचे त्यांच्या मुलाचे नाव घेत होते, असा आरोप प्रकरणातील फिर्यादी उमेश माने यांनी माध्यमांशी बोलताना केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×