Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

‘आयसीएआय’तर्फे सीए विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परिषद

माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

marathinews24.com

पुणे – दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) अभ्यास मंडळाच्यावतीने ‘आयसीएआय’ पुणे शाखा व ‘विकासा’ शाखेच्या सहकार्याने सीए विद्यार्थ्यांसाठी कर्वेनगर मधील महालक्ष्मी लॉन्समध्ये येत्या ८ व ९ नोव्हेंबरला दोन दिवशी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘अग्रिया: लिडिंग माईंड, शेपिंग फ्युचर’ या संकल्पनेवरील या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. ८) सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार व परिषदेच्या समन्वयिका सीए प्रज्ञा बंब यांनी दिली.

विद्यार्थी दिवसानिमित्ताने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी

सीए सचिन मिणियार म्हणाले, “सीए विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची असते. देशभरातून दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. विविध विषयांवर दोन दिवस तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. ज्ञानवृद्धी, कौशल्य विकास यासह करिअरच्या संधी आणि चर्चासत्राचा यामध्ये समावेश आहे. ‘आयसीएआय’च्या अभ्यास मंडळाचे चेअरमन सीए रोहित रुवातीया, व्हाईस चेअरमन सीए संजीब संघी, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.”

सीए प्रज्ञा बंब म्हणाल्या, “सीए सुजाता बोगावत यांचे स्टार्टअपवर, सीए ललित वालेचा यांचे जागतिक व उदयोन्मुख संधी यावर, सीए निखिल तोतुका यांचे कृत्रिम बुद्धिमतेवर, सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांचे वित्तपुरवठा आणि अहवाल यावर, सीए राजेश शर्मा यांचे आर्टिकल शिपवर, सीए अर्पित काबरा यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर, तर आयआरएस हर्षद आराधी यांचे कौशल्य विकासावर मार्गदर्शन सत्र होणार आहे. ‘कॅपिटल मार्केट्स’ विषयावरील चर्चासत्रात सीए रिषभ जैन, सीए यशवंत मंगल, सीए भंवर बोराना विचार मांडणार आहेत. सीए अमृता कुलकर्णी चर्चासत्राचे संचालन करणार आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×