Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

विवाहाच्या आमिषाने झाली फसवणूक, परिचारिकेने केली आत्महत्या

विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या

तरुणावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने जाळ्यात ओढून फसवणूक केल्याने परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ भागात घडली. तरुणीची फसवणूक करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वैशाली त्रिभुवन (वय २४, रा. भारती विद्यापीठ रुग्णालय परिचारिका वसतिगृह, धनकवडी, मूळ रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव आहे.

दहशतीच्या बळावर आंदेकर टोळीने कमाविली १८ कोटी रुपयांची मालमत्ता – सविस्तर बातमी

जिजा अण्णा त्रिभुवन (वय ४३, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैभव सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशालीने ८ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास भारती विद्यापीठ रुग्णालयाच्या परिचारिका वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली ही धनकवडीतील भारती रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. तिची वैभव सातपुते याच्याशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने वैशालीशी संबंध तोडले. त्याने विवाह करण्यास नकार दिला. शारिरिक आणि मानसिक त्रासामुळे मुलगी वैशालीने ८ सप्टेंबर रोजी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे वैशालीचे वडील जिजा त्रिभुवन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वैशालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी वैभव सातपुते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×