मेरिडियन आईस्क्रीम, पुणे तर्फे आयोजन
marathinews24.com
पुणे – बदाम, पिस्ता, मनुका यांची आकर्षक सजावट आणि चांदी व सोन्याच्या वर्कने साकारलेल्या ५१ लिटरच्या पंचमेवा आईस्क्रीमचा नैवेद्य सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला दाखविण्यात आला. मेरिडियन आईस्क्रीम, पुणे तर्फे हे आईस्क्रीम तयार करण्यात आले असून मंदिरातील भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात आले.
अन्न व वस्त्राबाबतची मदत पूरग्रस्तांना तातडीने पोहोचवणे आवश्यक – सविस्तर बातमी
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात मेरीडियन आईस्क्रीम, पुणे तर्फे हे पंचमेवा आईस्क्रीम देवीला अर्पण करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. मेरिडियन आईस्क्रीमच्या पूजा चव्हाण, निलेश चव्हाण यांनी हे आईस्क्रीम अर्पण केले.
निलेश चव्हाण म्हणाले, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मेरीडियन आईस्क्रीम, पुणे तर्फे पंचमेवा आईस्क्रीम देवी महालक्ष्मीच्या चरणी महाप्रसाद म्हणून अर्पण करण्यात आले. पहिल्यांदाच हा खास पंचमेवा फ्लेवर महाप्रसादासाठी सादर करण्यात आला. ताजे दूध व क्रीम, बदाम, पिस्ता, मनुका, किसलेला नारळ, केशर तसेच चांदी आणि सोन्याच्या वर्कने सजवून हा महाप्रसाद तयार करण्यात आला.





















