Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

बँकेतून बोलत असल्याच्या बतावणीने ऑनलाईन गंडा

ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला

मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँकेतून बोलत असल्याच्या बताणी करीत सायबर चोरट्याने एका महिलेला ९ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १६ ते १७ ऑगस्टला स्वारगेट परिसरातील महर्षीनगरात घडली आहे. याप्रकरणी ४५ महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महर्षीनगरमध्ये राहायला असून, १६ ऑगस्टला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. महिलेचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्याकडून बँकखात्याचे डिटेल्स घेतले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईनरित्या ९ लाखांची रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली. रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×