समुद्र संवर्धनासाठी सागर महोत्सव – जनजागृती, शिक्षण व पर्यटनाचा संगम
marathinews24.com
पुणे – पर्यटन संचालनालयामार्फत आसमंततर्फे सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या शाश्वत विकास ध्येयामध्ये महासागर, समुद्र व सागरी संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत वापर यावर भर देण्यात आला आहे. सागर महोत्सव हा केवळ समुद्राचा उत्सव नसून किनारी जीवनाच्या पर्यावरणीय महत्त्वाविषयी जनतेला शिक्षित करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. या महोत्सवादरम्यान तज्ज्ञांची सागरी जीवनावरील व्याख्याने, नोडल प्रदर्शने तसेच किनारी जैवविविधतेवरील अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पुण्यातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन – सविस्तर बातमी
विविध उपक्रमांतून लोक, जमीन आणि महासागर यांच्यातील संबंध दृढ करण्यावर भर दिला जात आहे. खडकाळ व वालुकामय किनाऱ्यांवरील अभ्यास दौरे, खारफुटी क्षेत्र निरीक्षण तसेच वाळू शिल्पकला प्रदर्शन आयोजित करून पुढील पिढीला महासागर जीवनाचा शोध घेण्यासाठी व त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.तसेच या महोत्सवा अंतर्गत जबाबदार पर्यटन या विषयावर फर्ग्युसन महाविद्यालयातील एन. एस. एस. स्वयंसेवकांच्या वतीने २६ सप्टेंबर रोजी, दुपारी १२.३० ते १ या वेळेत मध्यवर्ती इमारत, पुणे येथे सादरीकरण करण्यात येणार आहे.





















