गुन्हे शाखेच्या युनिट पाचची कोंढव्यात कारवाई
marathinews24.com
पुणे – बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. सराइताकडून पिस्तूल, एक काडतूस जप्त करण्यात आले. मौला उर्फ माैलान रसूल शेख (वय २२, कोंढवा बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शेख सराइत गुन्हेगार असून, तो कोंढव्यातील लक्ष्मीनगर आणि अश्रफनगर भागात वास्तव्यास आहे.
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थिचा मोबाइल हिसकावला – सविस्तर बातमी
गुन्हे शाखेचे युनिट पाच हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शेख याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील सहायक पोलीस फौजदार राजस शेख आणि पृथ्वीराज पांडुळे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कोंढवा परिसरात सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली असता, त्याच्याकडे देेशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, विनोद शिवले. शहाजी काळे, प्रताप गायकवाड, विनोद निंभाेरे, उमाकांत स्वामी, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांनी केली.