Breking News
विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडेपुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जीअपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधारअल्पवयीन पीडित मुलीला उपचारासाठी ८ तास ताटकळत ठेवणे डॉक्टरांना भोवले“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर

पीएमपी चालकाच्या डोक्यात दगड मारला

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पुणे-सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गातून निघालेल्या दुचाकीस्वाराने पीएमपी चालकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरेश विठ्ठल गुंठे (वय ४०, रा. कात्रज गाव) असे जखमी झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार मन्सूर गफूर शेख (वय २४, रा. झांबरे वस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुंठे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातून पीएमपी बस बीआरटी मार्गातून १४ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार मन्सूर शेख बीआरटी मार्गातून निघाला होता. दुचाकीस्वार शेखने किरकोळ वादातून दुचाकी पीएमपी बससमोर आडवी लावली. बीआरटी मार्गात दुचाकी लावून त्याने पीएमपी चालक गुंठे यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करुन डोक्यात दगड घातला. गुंठे यांचा मोबाइल संच फोडला. त्यांच्या गळ्यातील चांदीची साखळी तोडून नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×