Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप

सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

marathinews24.com

पिंपरी – महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे आज सर्वपक्षीय २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश करून घेतला आहे. महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. शहरात राजकीय दिवाळी सुरू झाली आहे.

हृदय शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा; डाॅक्टरविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

महापालिकेची निवडणूक ‘‘पिंपरी-चिंचवडचा दादा विरुद्ध बारामतीचा दादा’’ अशी होणार आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकरांनी नोंदवले आहे. प्रवेशांसाठी कोणत्याही स्थानिक नेत्याला पक्षश्रेष्ठींकडे विशेष ‘फिल्डिंग’ लावावी लागली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या काळात शहरातील निर्णय शहरात होतात, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार महेश लांडगे यांनी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराचे नेते म्हणून राष्ट्रवादीला अक्षरश: घायाळ केले आहे. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा मोठा ‘पाठिंबा’ असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्याची नावे

१) माजी महापौर उभाठा गटाचे नेते – संजोगजी वाघेरे पाटील
२) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – उषाताई वाघेरे
३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – प्रशांत शितोळे
४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – विनोद नढे
५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – प्रभाकर वाघेरे
६) माजी उपमहापौर – राजू मिसाळ
७) उभाठा गटाचे नगरसेवक – अमित गावडे
८) उभाठा गटाच्या नगरसेविका – मीनलताई यादव
९) रवी लांडगे
१०) माजी नगरसेवक – संजय नाना काटे
११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – आशाताई सूर्यवंशी
१२) प्रवीण भालेकर
१३) जालिंदर बापु शिंदे
१४) सचिन सानप (स्वतः व पत्नी)
१५) दादा सुखदेव नरळे (स्वतः व पत्नी)
१६) सदगुरु कदम
१७) समीर मासुळकर (स्वतः व पत्नी)
१८) डॉ. सुहास कांबळे
१९) कुशाग्र कदम
२०) अशोक मगर
२१) नागेश गवळी
२२) प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक.
२३) नवनाथ जगताप – माजी स्थायी समिती अध्यक्ष.
२४) प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या निमित्ताने शहरातील सर्वपक्षीय मातब्बर नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्तवाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. देव-देश-धर्म अन्‌ संस्कृतीसाठी कटिबद्ध राहून पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी निर्विवाद विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×