दहावीत मिळवलेल्या यशामुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
marathinews24.com
पुणे – भंगाराची गाडी, कचर्यांच्या गाड्या, भाजी-पाल्यांचा गाडा, आणि युट्यूबवरील गेम व्हिडोओ बनण्याचे वेड… दिवस राब राबून कष्ट, आणि रात्री शिक्षणाची धडपड. पतीचे..वडीलांच्या निधनानंतर घर सांभाळाण्यची जबाबदारी… पहाटे कचरा वेचायचा, दिवसभर भाजीपाला विकायचा आणि रात्री अभ्यास करायचा. अशा कठीण परिस्थितीशील दोन हात करत शिक्षणाच्या वाटेवर चाललेल्या, शाहिद पठाण, रोहन शिंदे आणि ताई सपताळे यांच्यासह रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीत उल्लेखनिय यश मिळवले आहे. त्यांची ही यशोगाथा म्हणजे कष्ट, जिद्द आणि शिक्षणावरच्या निष्ठेचे जीवंत उदाहरण आहे. त्यांच्या यशामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्न – सविस्तर बातमी
बदलत्या तंत्रज्ञानात लहाणपणापासून शिकण्याची आवड असल्याने दिवसभर युट्यूबवर व्हिडोओ गेम्स तयार केले. आतापर्यंत 800 हून अधिक व्हिडोओ तयार केले. त्यामुळे रात्र शाळेत प्रवेश घेऊन दहावीचाही अभ्यास केला. माझी आवड पूर्ण करु शकल्याने अभ्यासातही मन रमल्याने रात्रशाळेत अव्वल क्रमांक मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे शाहीद पठाण याने सांगितले. सकाळपासून भंगाराची गाडी खाली करायची. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत भंगारच्या दुकानात अवचड काम करायचे. वडीलांचे निधन झाल्याने कुटूंबाची जबाबदारी माझ्यावर आली, त्यामुळे दहावीला पाच वर्षाचा खंड पडला. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची मनात जिद्द होती. पाच वर्षांनंतर दहावीला प्रवेश घेऊन रात्रशाळेत तिसरा येण्याचा मान मला मिळाल्याने नक्कीच आनंद झाला असल्याचे रोहन शिंदे याने सांगितले.
पहाटे घरोघरी कचरा वेचायचा…त्यानंतर मार्केट यार्डातून भाजीपाला आणून विकायचा. सकाळपासून ते अंधार होईपर्यंत कामच काम. हे काम करुन आपल्या आयुष्यातील अंधार घालवण्याचा संकल्प ताई सपकाळे यांनी केला.
सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेच्या पूना नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल 89.47 टक्के लागला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची ओढ न सोडता मेहनतीने अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. परीक्षेत प्रथम क्रमांक शाहिद मुबारक पठाण (67.20 टक्के), द्वितीय क्रमांक रोहन दीपक शिंदे (59 टक्के) तर तृतीय क्रमांक ताई सपताळे (58.20 टक्के) यांनी पटकावला. सीमा रामा ओव्हाळ यांनी 55.80 टक्के गुण प्राप्त करून विशेष उल्लेखनीय कामगिरी केली. महाविद्यालयात या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्राचार्य सतीश वाघमारे, वर्गशिक्षक महेश पिसाळ, लेखनिक केदार शिंदे, अनिल राक्षे आणि शाळा समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक उपस्थित होते.
माझ्या आवडत्या क्षेत्रात दिवसभर काम करुन रात्र शाळेत प्रवेश घेऊन अव्वल क्रमांक मिळाल्याचा आनंद झाला असल्याचे शाहीद पठाण याने सांगितले. सुरुवातीला मला युट्यूबवरील गेम व्हिडोओ बनविण्याचा विरोध झाला. पण मी रात्रीचा अभ्यास केल्याने कुटूंबाचा विरोध कमी झाला. आणखी मला पुढे शिकायचे असल्याचे शाहीद पठाण याने सांगितले.
सीमा ओव्हाळ यांनी तब्बल 25 वर्षांनंतर दहावीत प्रवेश घेतला. त्यांचे पती एसटीमध्ये चालक म्हणून काम करतात. मी एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. त्याचबरोबर मुलांचे शिक्षणही सुरु आहे. रात्रशाळेमुळे मला पुन्हा शिक्षण घेता आले, असे ओव्हाळ यांनी सांगितले. मुलगा अकरावीत असताना मी दहावीची परीक्षा दिली. पुढे बारावी पूर्ण करुन नर्सिंगचे पदवी घेता येणार असल्याने माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कोराना काळात पतीचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी माझ्यावर आली. खचून न जाता भाजीपाल्याचा व्यवसाय व सकाळी कचरा गोळा करण्याचे काम करत स्वतःच्या मुलांचे शिक्षण पुरवले. शिक्षण न झाल्यामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. शिक्षणाची गरज लक्षात येताच 20 वर्षांनंतर रात्रशाळेत प्रवेश घेतला आणि उत्तम यश मिळाले आहे. आणखी पुढे शिकत राहण्याचा मानस यावेळी ताई सपताळे यांनी व्यक्त केला.
दिवसभर भंगाराची गाडी खाली करण्याचे काम करुन रात्री अभ्यास केला. वडीलांच्या निधनानंतर कुटूंबाची आर्थिक जबाबदारी संभाळण्याचे काम आले. त्यात बहिणीचे लग्न, भावाचे शिक्षण केले. आता एका कार्यालयात साफसफाईचे काम करतो. माझ्या शिक्षणात पाच वर्षाचा खंड पडला. मात्र जिद्दीने अभ्यास करत दुसरा क्रमांक मिळवला, असे रोहन शिंदे यांने आनंदाने सांगितले. आता पुढे पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण करण्याची इच्छा आहे, असे यावेळी तो म्हणाला.