Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या आगामी “राइंदर” चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

पोस्टरने वेधले सर्वांचे लक्ष

marathinews24.com

पुणे – स्टोरी ऑफ लागिरं व अ व्हॅलेंटाईन्स डे या चित्रपटानंतर दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत एक नवा चित्रपट “राइंदर”. ”खोट्या खोट्या वर्दीला आता खरे खरे स्टार आणायचेत“ हे कॅप्शन लिहत रोहितराव यांनी पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाची रंगली मैफल..! – सविस्तर बातमी

या चित्रपटाचा भव्य पोस्टर अनावरण सोहळा पुण्यात नुकताच पार पडला. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या नावाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाची निर्मिती एम आर जोकर एंटरटेनमेंट करणार असून सार्थक ढोकले व तुषार होरे हे या चित्रपटाचे निर्मात्ये आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन रोहित राव नरसिंगे करणार असून त्या चित्रपटात ते कलाकार म्हणून झळकणार आहेत. अभिजीत शिंदे सह दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे. एम आर जोकर एंटरटेनमेंट प्रस्तुत “राइंदर” हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

“राइंदर” चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळ्याला दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे, सह दिग्दर्शक अभिजीत दत्तात्रेय शिंदे, निर्माते सार्थक ढोकले, तुषार होरे तसेच चित्रपटातील तंत्रज्ञ उपस्थितीत होते. या सोहळ्याला प्रसिद्ध उद्योगपती मा. प्रकाशशेठ धारीवाल व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराजराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच भोसरी विधानसभा आमदार मा. महेशदादा लांडगे, आमदार मा. विलास लांडे, नगरसेवक मा. विलासभाऊ मडिगेरी, नगरसेवक मा. संजयशेठ वाबळे, सामजिक कार्यकर्ते मा. योगेशभाऊ लांडगे, युवा नेते मा. दिनेशभाऊ यादव, नगरसेवक मा. विक्रांतदादा लांडे, युवा नेते मा. शिवराजदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे “राइंदर” चित्रपटाच्या पोस्टरविषयी सांगतात, “राइंदर” या शब्दाचा अर्थ म्हणजे रायरन किंवा बहुरूपी. अशी लोक जे एखाद्या गोष्टीच सोंग घेतात. अशी विचित्र माणस की त्यांच्या विविध छटा असतात. या चित्रपटाची भाषा ग्रामीण असली तरी हा चित्रपट तुमच्या मनावर राज्य करेल याची मी शाश्वती देतो. या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरचं सुरू होईल. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”

Link : https://www.instagram.com/p/DP0oN49AlGL/?igsh=MTdodmRuZGgzN3YxZg==

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×