Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

‘एआय समिट’मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन

पुणे जिल्हा-शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन

marathinews24.com

पुणे – नवी दिल्ली येथे आयोजित एआय समिटमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुणे जिल्हा शहर युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. गुडलक चौकात झालेल्या आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत भारतीय जनता पार्टी व पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, आक्रमक झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

काेंढवा भागातील वाहतुकीत बदल; कौसरबागेत जड वाहनांना बंदी – सविस्तर बातमी

युवक काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी शांभवी शुक्ल, प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथमेश आबनावे म्हणाले, “भाजपकडून लोकशाही दाबण्याचे काम सुरु आहे. पंतप्रधान मोदी एप्सटिन फाईलवर बोलत नाहीत; माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावर बोलत नाहीत. देशाची सुरक्षा आणि हित या दृष्टीने मोदी यांचे मौन गंभीर बाब आहे.”

उमेश पवार यांनी सांगितले की, युवक काँग्रेसच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर केलेली कारवाई निषेधार्ह आहे. आम्ही भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आंदोलन करत आहोत. काल ज्या पद्धतीने आमचे नेते उदय भानू चिब यांना कार्यालयात जाऊन अटक करण्यात आली, ते खूपच निषेधार्थ आहे.

सौरभ अमराळे म्हणाले, “पोलिसांचे बळ वापरून न्यायासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, युवक कॉग्रेस हा अन्याय सहन करणार नाही. देशासाठी, न्यायासाठी आमचा लढा कायम सुरु राहील.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×