मारहाण करणाऱ्या ७ जणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – गावाेगावी ग्राम दैवताच्या यात्रा सुरू झाल्या आहेत. गावातील वार्षिक उत्सवात कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच हवेली तालुक्यातील बुर्के गावात आखड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.
शंकर ठोंबरे (वय ३८), सुनील ठोंबरे (वय ४०), सुनील जांभळकर (वय ४२), संतोष जांभळकर (वय ३७), सागर जांभळकर (वय २७), विशाल जांभळकर (वय २९), गणेश जांभळकर (वय ३५, सर्व रा. बुर्केगाव, नगर रस्ता, ता. हवेली, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष महादू पवळे (वय ४९, रा. बुर्केगाव) यांनी लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन लवकरच – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुर्के गावातील यात्रेत मंगळवारी सायंकाळी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. सायंकाळी आखाड्याजवळ कुस्ती पाहण्यासाठी काहीजण बसले होते. त्यावेळी आखाड्याजवळ बसण्याच्या वादातून अभिजित बाजारे आणि शंकर ठोंबरे यांच्यात वाद झाला. वादातून ठोंबरे, जांबळकर यांनी अभिजित बाजारे, संदीप थोरात, सौरभ बाजारे, अभिषेक गायकवाड यांना लाथाबुक्क्या, काठीने मारहाण केली. आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. कुस्तीच्या आखाड्यात मारामारीची घटना घडल्याने घबराट उडली. पोलिसांनी याप्रकरणी गर्दी, तसेच मारामारीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वंजारी तपास करत आहेत