Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुणे पोलिसांनी नोंदवला रोहिणी खडसे यांचा जबाब

पुणे पोलिसांनी नोंदवला रोहिणी खडसे यांचा जबाब

खराडी पार्टी प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील खराडीमधील मद्य पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांची पत्नी रोहिणी खडसे यांचा सोमवारी (दि. ६ ) गुन्हे शाखेने जबाब नोंदविला आहे. गुन्हे शाखेकडून रोहिणी यांची चौकशीही करण्यात आली. खराडीतील हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ जुलैला मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद. सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा यांना अटक केली होती.

बारामती तालुक्यात १२ ऑक्टोबरला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम – सविस्तर बातमी 

आरोपींकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, १० मोबाइल , सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

डाॅ. खेवलकर यांना २५ सप्टेंबरला जामीन मंजूर झाला होता. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले कोेकेन, गांजासदृश अमली पदार्थ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. डाॅ. खेवलकर यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यांच्या रक्ताचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेने याबाबतचा अहवाल नुकताच पुणे पोलिसांना दिला. या अहवालात डाॅ. खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे.

खराडी पार्टी प्रकरणात डाॅ. खेवलकर यांची पत्नी रोहिणी खडसे यांचा सोमवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत जबाब नोंदविण्यात आला. त्याअनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात आली. या वेळी ॲड. पुष्कर दुर्गे उपस्थित होते. खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांचा जबाब नोंदविण्यात आला नव्हता. तपासाच्या अनुषंगाने चौकशी करुन पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×