Breking News
अल्पवयीन मुलाच्या खुनप्रकानी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा२२ मोबाइल, ६ दुचाकी चोरणार्‍याला अटक, अल्पवयीन ताब्यातशेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावलमित्राने अनैसर्गिक संबंध ठेऊ दिले नाही, वादातून केला खूनएटीएम कार्डचा गैरवापर, दोन महिलांची ९० हजारांची फसवणूकपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेला २२ लाखांचा गंडाबारामतीत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहातसीबीआय ऑफिसर बोलत असल्याची केली बतावणीमित्राचा गळा आवळून ठार मारले, दोन महिन्यांनी खूनाला वाचाअवैध वाळू उपसा करणार्‍या सराईताविरूद्ध कारवाईचा बडगा

पुण्यातही रूटमार्च अन मॉकड्रील

एनएसजी, पुणे पोलीस, अग्निशमक दलाकडून प्रात्यक्षिके

marathinews24.com

पुणे – दहशवाद्यांनी जम्मूतील पहलगामध्ये पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थाननमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एअर स्ट्राईक करीत पाकड्यांना धडा शिकवला आहे. त्यासोबतच केंद्र शासनाच्या आदेशानुसार पुण्यातही बुधवारी (दि.७) ठिकठिकाणी पोलिसांनी रूटमार्च करीत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. तसेच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेसह स्थानिक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणांवर संकटसदृश्य प्रात्यक्षिके केली. संकटप्रसंगी सामोरे कसे जायचे, हल्ला झाल्यानंतर स्वसंरक्षण कसे करायचे, अफवांपासून दूर कसे राहायचे याबाबतचे प्रात्यक्षिके केली.

शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मागील दोन दिवसांपासून पुण्यात पोलिसांकडून रूटमार्चवर भर दिला आहे. त्यासोबतच केंद्र शासनाच्या आदेशानुसार मॉकड्रील, स्वसंरक्षणार्थ खबरदारीच्या उपाययोजना यासंदर्भात प्रात्यक्षिके करण्यात आली. विशेषत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (एनएसजी) पथकाकडून पुण्यातील महत्वाच्या ठिकाणी रंगीत तालिम करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणांसह दरदिवशी हजारोंच्या संख्येने वर्दळ असलेल्या भागात एनएसजी कमांडोने सुरक्षितता दाखवून दिली. त्यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमलदारांसह अधिकार्‍यांनी त्यांना मदत केली. दहशतवादी हल्ल्यासह संकटसदृश्य परिस्थितीला सामोरे जाताना कशी तयारी असली पाहिजे, याचेही धडे दिले. पोलिसांकडून मॉकड्रील सुरू असताना नागरिकांनी घाबरू नये यासाठी वारंवार आवाहन केले जात होते. मॉकड्रीलदरम्यान स्वसंरक्षणार्थ विविध अ‍ॅक्टीव्हिटीवर भर दिला होता. अग्निशमक दल, पोलीस, स्थानिक यंत्रणाद्वारे नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्थानिक पोलसिांकडून रूटमार्च करीत पेट्रोलिंग केले. यावेळी अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकांसह पोलीस अमलदार रूटमार्चमध्ये सहभागी झाले होते. प्रामुख्याने महत्वाच्या चौकात, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले होते. युद्धसदृश्य परिस्थिती आल्यानंतर पोलिसांच्या तयारीचे प्रात्यक्षिक पायी रूटमार्चद्वारे दाखविण्यात आले. मॉल, बसस्थानक, गर्दीचे ठिकाण, थिएटर, सार्वजनिक बाग परिसरासह संपुर्ण शहरात पोलिसांकडून काढण्यात आला होता. त्यामुळे रूटमार्चमुळे शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून आले. एनएसजी पथक, स्थानिक पोलीस, अग्निशमक दलाककडून जागोजागी सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. संवेदनशील ठिकाणे, महत्त्वाचे ठिकाणी केंद्रीय यंत्रणांसह पोलीसांनी संयुक्तरित्या प्रात्यक्षिक केले.

पुण्यातील पीडित कुटूंबियांना पोलीस संरक्षण

पुण्यातील जगदाळे आणि गनबोटे कुटूंबियातील पुरूषांना दहतशवाद्यांनी गोळ्या मारून ठार केले आहे. संबंधित कुटूंबियांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले आहे. जगदाळे आणि गनबोटे कुटूंबियांच्या घराजवळ चार अमलदार आणि एक पोलीस अधिकार्‍यांना बंदोबस्त तैनात केला आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही कुटूंबियाच्या भेटीसाठी अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपींसह नागरिक येत आहेत. संबंधितांची सुरक्षिततता वाढावी, इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही कुटूंबाला संरक्षण दिले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top