Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न

वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी अभ्यासपूर्ण प्रकल्प तयार करा- विभागीय आयुक्त

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील वाहतूक योजनांचे नियोजन, सुसूत्रीकरण आणि अंमलबजावणी करण्यासाठी ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची १९ वी आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा प्राधान्यक्रम ठरवून वाहतूक नियमनासाठी अभ्यासपूर्ण प्रकल्प तयार करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक संपन्न; १३८० उमेदवारांना प्रशिक्षणास प्रशासकीय मान्यता – सविस्तर बातमी

बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृष्य प्रणालीद्वारे), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पुणे मनपा अपर आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक नियमन योग्यरितीने होण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या भागांचे सर्व्हेक्षण करावे. वाहतुकीचा प्रारंभ व दिशा यांचे सर्वेक्षणानुसार प्रकल्पांचे सादरीकरण करावे, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

लोकहित लक्षात घेऊन वाहतूक प्रकल्पांचे प्रस्ताव तयार करावेत. जास्त ट्रॅफिक होणाऱ्या भागांमध्ये मास्टर टनेल करावेत, असे म्हसे यांनी सांगितले. वाहनांसाठी पार्किंग पॉलिसी लक्षात घेऊन बोगद्यांची संख्या व दिशा निश्चित करावी, असे हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, तसेच नगररचना वाहतूक व परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×