धानोरीतील घटना
marathinenews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघा भावडांवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. ही घटना २५ एप्रिलला रात्री साडेनउच्या सुमारास विश्रांतवाडीतील मुंजाबा वस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी हल्लेखोरांसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे सोन्याचे गंठण चोरले – सविस्तर बातमी
पंकज कुमार आणि साहू कुमार ( दोघेही रा. मुंजाबा वस्ती )अशी गंभीररित्या जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेश राधेश्याम गुप्ता (वय ४०, रा. धानोरी) याला अटक केली आहे. नितीन गुप्ता (वय २५), आकाश गुप्ता (वय १९) यांच्यासह एका अनोळखीवर गुन्हा दाखल केला आहे. राहुल कुमार गौतम (वय २३ रा. मुंजाबावस्ती ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजकुमार आणि आरोपी गुप्ता कुटूंबिय यांच्यात काही दिवसांपुर्वी वादविवाद झाले होते. त्याचा राग गुप्ता कुटूंबियामध्ये होता. त्याच रागातून २५ एप्रिलला टोळक्याने पंकजला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यावेळी पंकजचा भाउ साहूने भांडणात मध्यस्थी केली. त्यावेळी टोळक्याने त्याच्यावरही वार करून गंभीररित्या जखमी केले. दोन्ही जखमी भावडांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे तपास करीत आहेत.