Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील २०० जणांची चौकशी

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी

पुणे, मुंबईसह राज्यभरात छापे; चौकशीसााठी काहीजणांना ताब्यात

marathinews24.com

पुणे – पाकिस्तानातील गुंड, दहशतवादी कारवाईत गुंतलेला गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित २०० जणांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली. त्याअनुषंगाने पुणे, मुंबईसह राज्यभरात छापे टाकण्यात आले. राज्यातील वेगवेगळ्या भागात पोलिसांनी कारवाई करुन चौकशीसााठी काहीजणांना ताब्यात घेतले.

मोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज; सखोल जिओटेक्निकल व फॉरेन्सिक तपासणीची गरज – PSEA – सविस्तर बातमी 

एटीएसच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. शहजाद भट्टी, त्याचे साथीदार अमजल गुज्जर, अबिट जाट, राणा हुसेन, अब्दुल मेनन, मुन्ना झिंगाडा, फारूख खोकर, जाफर सुपारी, सनी टायगर, शेख सलमान, सर्फराज डोंगर उर्फ जोरासिंग, अबू मुसा, सरकार हे समाज माध्यमातून काही तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. देशभरातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करत होता. त्यासाठी तो समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करत होता. भट्टी आणि त्याच्या साथीदारांशी समाज माध्यमातून संपर्कात असणाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. एटीएसच्या पथकाने त्याअनुषंगाने २०० ठिकाणी छापे टाकले. त्याअनुषंगाने शुक्रवारी (१० जुलै) त्यांची चौकशी करण्यात आली, अशी माहिती ‘एटीएस’ मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पाकिस्तानी गुंड भट्टी आणि त्याचे साथीदार देशभरातील तरुणांशी समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर करुन त्यांच्या संपर्कात होते. त्याांना संदेश पाठविणे, तसेच गु्न्हेगारीचे उद्दात्तीकरण करणारे संदेश पाठविण्यात येत होते. तरुणांना देशविघातक कारवाईसाठी भट्टी आणि साथीदार प्रवृत्त करत होते. अशा तरुणांची चौकशी करुन त्यांना भट्टी आणि साथीदारांच्या विळख्यातून सोडविणे, तसेच गंभीर बाब आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी चौकशी करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×