Breking News
माजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजननाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह यशस्वी करा…दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंद

टोळक्याकडून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण

दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

marathinews24.com

पुणे – गप्पा मारत थांबलेल्या टोळक्याला रस्त्यातून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. टोळक्याने दांडके आणि लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत निवृत्त पोलिसाच्या डोळ्याला दुखापत झाली, तसेच नाकातून रक्तस्राव झाला. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण यशवंत पाटील (वय ५८, रा. पद्मछाया सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील गौतम कसबे (वय ३०), जतीन मधुकर बोळे (वय २२, दोघे रा. धनकवडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाटील यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील हे जानेवारी महिन्यात पुणे पोलीस दलातून निवृत्त झाले. त्यांची मुले परदेशात नोकरी करतात. पाटील आणि त्यांची पत्नी चव्हाणनगर भागातील साेसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (२४ जून) रात्री दहाच्या सुमारास पाटील दाम्पत्य दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी राजीव गांधी वसाहत परिसरात सुनील कसबे, जतीन बोळे आणि साथीदार हे रस्त्यात दुचाकी लावून गप्पा मारत थांबले होते. पाटील यांनी त्यांना दुचाकी बाजूला काढण्यास सांगितले.

रस्त्यात गाडी लावल्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना त्रास होत असल्याचे पाटील यांनी आरोपींना सांगितले. या कारणावरून आरोपींनी पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. कसबे आणि साथीदारांनी पाटील यांना दांडक्याने, त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत पाटील यांच्या डोळ्याला दुखापत झाली, तसेच त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला. सोसायटीतील महिलांना आरडाओरडा केला. रहिवासी जमल्यानंतर आराेपी तेथून पसार झाले. पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

आरोपी कसबे, बोळे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना नाेटीस बजाविण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top