Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही – उद्धव ठाकरे

सरहद पुणेच्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. त्यामुळे सत्ता प्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सरहद, पुणेच्यावतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सरहदचे संस्थापक संजय नहार, संतसिंग मोखा, वसंत मोरे, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्ह्यातील ३९९ अनुकंपा उमेदवार, लोकसेवा आयोगाकडील ३७२ उमेदवारांना नियुक्तीपत्रे – सविस्तर बातमी

उद्धव ठाकरे यांनी वडील बाळासाहेब ठाकरे आणि काका श्रीकांत ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझे काका श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने स्टुडिओ साकारला याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या मनात सतत संगीत सुरू असायचे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर होते. त्यांच्यासमवेत त्यांची ही दोन मुले बाळासाहेब आणि श्रीकांत यांनी मार्मिकच्या माध्यमातून सर्व मदत केली होती. असे काका आणि वडील लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिकामध्ये आहे. त्यामुळे बाळासाहेबांनीसुद्धा सत्तेसाठी कधी राजकारण केले नाही. वेळ आली तेव्हा सत्तेवर लाथ मारली. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे.

मणिपूरमधील मुलीने माझा सन्मान केला त्याने मी निःशब्द झालो आणि मला गहिवरून आले असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, २०१४ नंतर खरे तर युतीचे सरकार आले. पण आज परिस्थिती काय आहे. मणिपूर पेटलेले आहे. लेह-लडाखमध्ये संघर्ष सुरू आहे. गावागावात जवान तैनात केलेले आहेत. आसाममध्येही परिस्थिती पेटलेली आहे. काश्मीरमध्येही अशांतता आहे, हे सगळे चित्र चांगले नाही. ७५ वर्षे झाली आता हेच का स्वातंत्र्य असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. अशा परिस्थितीत सूर जुळवायचे कसे आणि मैफिल रंगवायची कशी हा प्रश्न पडतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले, श्रीकांत ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते उत्तम संगीतकार, व्यंगचित्रकार, वक्ते, संपादक, लेखक होते. बाळासाहेब आणि त्यांची राम-लक्ष्मणाची जोडी होती. संगीतक्षेत्राला त्या काळात ५० वर्षे पुढे नेण्याचे काम श्रीकांत ठाकरे यांनी केले. आज जे मोठे गायक दिसतात त्यातील अनेकांना पहिल्यांदा गाण्याची संधी ठाकरे यांनीच दिली होती.

प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी बाळासाहेबांच्या अनेक मौलिक आठवणींना उजाळा दिला. तर संजय नहार यांनी काश्मीरमधील कुपवाडा येथील मुले मातोश्रीवर आलेली होती त्यावेळी आत येताना ती घाबरत होती. पण बाहेर पडल्यानंतर आमच्या आजोबांना भेटल्यासारखे आम्हाला वाटले अशा भावना मुलांनी व्यक्त केल्या होत्या. ही आठवण नहार यांनी सांगितली. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या मातीतील उमदे व्यक्तिमत्त्व होते असे सांगून त्यांनी आठवणी जागवल्या. यावेळी गुजरवाडी व कात्रज ग्रामस्थांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

महमंद रफींसाठी मराठी गाणे लिहिले ऊर्दूत – ठाकरे

मजहर सिद्दीका यांनी शोधिशी मानवा हे गीत सादर केले त्याचे अभिनंदन करून उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत ठाकरे यांची एक सुंदर आठवण सांगितली. श्रीकांत ठाकरे यांनी महंमद रफी यांच्याकडून हे गीत गाऊन घेतले होते. पण विशेष म्हणजे श्रीकांत ठाकरे यांना उत्तम ऊर्दू येत असते. त्यामुळे महंमद रफी यांना त्यातील शब्द कळावेत म्हणून ते मराठी गाणे त्यांनी महंमद रफी यांना ऊर्दूत लिहून दिले होते. ठाकरे यांनी सांगितलेल्या या आठवणीला उपस्थितांनी दाद दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×