अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण
marathinews24.com
पुणे – पंढरपूरला दर्शनासाठी मोटारीतून चाललेल्या वारकर्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्या टोळीतील एका संशयित आरोपीचे स्केच पोलिसांनी रेखाटले आहे. संबंधित स्केचबाबतीत मिळत्या-जुळत्या चेहर्याच्या व्यक्तीची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन दौंड पोलिसांनी केले आहे. लुटमारीची घटना सोमवारी (दि.३०) पहाटे सव्वा चारच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी-चिंचोली गावालगत महामार्गावर घडली होती. कोयताधारी चोरट्यांपैकी एकाने १७ वर्षीय मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणात दौड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला गती दिली आहे.
दरोडा रोखताना पोलिसावर केला होता वार, सराईताला अटक – सविस्तर बातमी
देवदर्शनासाठी चाललेले कुटूंबिय ३० जूनला पहाटे सव्वा चार वाजता चहापान करण्यासाठी स्वामी चिंचोली (ता. दौड) गावाजवळील टपरीजवळ थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर कोयताधारी हल्लेखोरांनी महिलेच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या गळ्यातील दीड लाखांचे दागिने लुटून नेले होते. तर एका आरोपीने कोयत्याच्या धाकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पुणे ग्रामीण पोलिसांची १० पथके तपासासाठी रवाना करण्यात आली. तसेच आजूबाजूच्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह छोट्या-मोठ्या आरोपींची धरपकड सुरू आहे.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. याप्रकरणी कोणाला काही माहिती मिळाल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (मोबा. क्र. ९०४९६६४६७३), एपीआय राहुल गावडे (मोबा. क्र. ९८२३१६५०८०) एपीआय दत्ताजी मोहिते ( मोबा. क्र. ८३०८८४४००४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, युद्धपातळीवर तपास
लुटमारीसह अत्याचार प्रकरणात दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा करण्यात आला आहे. रजि. नं. ४४८/२०२५ अन्वये, भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३०९ (६), ३५१ (२), ३(५) व इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे. संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपीचे स्केच पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून जारी करण्यात आले आहे. स्केचमध्ये दाखविलेल्या व्यक्तीबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, अधिकार्यांशी संपर्क साधावा. आपल्या सहकार्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना मदत होणार असून, नागरिकांनी पोलिसांना विश्वासात घेऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.