गाडीतळ पोलीस चौकीत शिपायाला धक्काबुक्की

गाडीतळ पोलीस चौकीत शिपायाला धक्काबुक्की

फरासखाना पोलिसांनी गुन्हा केला दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मंगळवार पेठेतील गाडीतळ चौकीत गोंधळ घालून पोलीस शिपायाला धक्काबुक्की केल्या प्रकरणी एका विरुद्ध  केला. याप्रकरणी संतोष विठ्ठल खंकाळ (वय ५३, रा. लोकसेवा तरुण मंडळाजवळ, मंगळवार पेठ) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रशांत तुर्डे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फुरसुंगी, वाघोली परिसरात घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील वादावादीच्या प्रकरणात गाडीतळ पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी आरोपीला १४ मार्च रोजी दुपारी बोलावून घेतले होते. ’ तू मला बोलावून घेतले. तू साधा पोलीस शिपाई आहे. तुला तपासाचा अधिकार नाही’, अशी अरेरावी करून आरोपीने पोलीस शिपाई तुर्डे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुर्डे यांना धक्काबुक्की करण्यात आली. आरोपीने पोलीस चैाकीच्या आवारात गोंधळ घातला. तुझ्याविरुद्ध माझ्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत. तू मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवतो. तुझी तक्रार पोलीस आयुक्तांकडे करून नोकरी घालवतो’, अशी धमकी पोलीस शिपाई तुर्डे यांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×