बनावट कागदपत्रे सादर करुन शस्त्र परवाना
marathinews24.com
पुणे – सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणातील आरोपी दीर सुशील हगवणे याने बनावट कागदपत्रे सादर करुन पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. याप्रकरणात सुशीलचा तााबा कोथरूड पोलिसांनी सोमवारी (दि.९) घेतला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
केंद्रीय राज्य मंत्र्याची अशीही संवेदनशीलता – सविस्तर बातमी
वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हे मुळशी तालुक्यातल भुकूम येथे वास्तव्यास आहेत. २०२२ मध्ये त्यांनी पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला हाेता. त्यांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात सदनिकेचा भाडेकरार वास्तव्याचा पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केला होता. शशांक, सुशील आणि हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण यांनी एकाच वर्षी शस्त्र परवाने मिळवले होते.
याप्रकरणाच्या तपासात दोघांनी शस्त्र परवान्यासाठी बनावट पत्ते दिल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले.हगवणे आणि चव्हाण हे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणात सुशीलला सोमवारी कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले. शशांक आणि नीलेश चव्हाण यांना मंगळवारी (१० जून) ताब्यात घेतले जाणार आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.