Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागे

अवघ्या दहा दिवसांत निर्णय बदलला; पोलीस आयुक्तांनी निलंबन रद्द करून सेवेत घेतले

marathinews24.com

पुणे – शहरातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील बेशिस्त फ्लाईंग जिप्सी कॅफेवर केलेल्या कारवाईमुळे पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची झालेली चुकीची कारवाई पोलीस प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे अवघ्या १० दिवसांत संबंधित कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकावरील निलंबन रद्द केले आहे. त्यांना पुन्हा सेवेत हजर करून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावरील चुकीच्या कारवाईबाबत सोशल मीडियावरही नेटीझन्सनी रोष व्यक्त केला होता.

मोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद – सविस्तर बातमी

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेशिस्त फाईंग जिप्सी कॅफेविरूद्ध मागील काही महिन्यांत ६ वेळा खटले दाखल केले होते. मात्र, तरीही ७ जूनलाही त्याने नियमांचे उल्लंघन करीत कॅफे मध्यरात्री पावणेदोननंतरही उघडे ठेवले होते. त्यादिवशी ड्युटीवर असलेले उपनिरीक्षक कदम यांनी धाव घेउन कॉफीचे ३ ग्लास काठीने उडवले. याप्रकरणी त्यांना थेट निलंबित केले होते. अर्धवट माहितीसह व्हिडिओ वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दाखवला होता. तसेच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर २९ जूनला कदम यांचे निलंबन केले होते. मात्र, फ्लॉईंग जिप्सी कॅफे मालकाविरूद्ध अनेक तक्रारी असून, त्याच्याविरूद्ध विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.

ड्युटी निभावणाऱ्या फौजदाराला निलंबनाच्या शिक्षेमुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या रोषावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने केलेली कारवाई चुकीची नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार ८ जुलैला झालेल्या आढावा समितीच्या बैठकीत उपनिरीक्षक संदीप कदम यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून, त्यांना पुनःस्थापित करण्यात आले आहे. दरम्यान, सातत्याने नियमांचे उल्लंघन करीत पोलिसांना न जुमानणार्‍या फ्लाईंग जिप्सी कॅफे चालक व मालकावर आता काय कारवाई केली जाणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×