लोणी काळभोर पोलिसांची माणुसकी

लोणी काळभोर पोलिसांची माणुसकी

वर्गणीद्वारे नुकसानग्रस्त नागरिकांना केला शिधा वाटप

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील थेऊरमधील रुके वस्तीवर ढगफुटी सदृश्य पाऊस पडून नैसर्गिक आपत्तीची घटना १५ सप्टेंबरला घडली होती. त्यामुळे नागरिकांचे घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेथील आपत्‍तीग्रस्‍त नागरिकांना लोणी काळभोर पोलीस ठाणेच्यावतीने मदत करण्यात आली. दिवाळीच्या मुहूर्तावर लोणी काळभोर पोलिसांनी एकत्रितरीत्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून संबंधितांना मदत केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले कर्डीले कुटुंबीयांचे सांत्वन – सविस्तर बातमी 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गणीतून रुके वस्तीवरील २८ कुटुंबीयांना शिधावाटप आणि दिवाळीचे साहित्य, मिठाई वाटप करण्यात आले. शिधा वाटपाचा कार्यक्रम दि. १८ ऑक्‍टोबरला लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पार पडला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे हस्ते नागरिकांना मदत करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×