Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड

पुणे स्टेशन परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीन जप्त करण्यात आले. देव दिनेश परमार (वय २३, रा. भाजी मंडईजवळ, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शिपाई ला मारहाण करणारा अटकेत – सविस्तर बातमी

पुणे स्टेशनजवळ असलेल्या मालधक्का भागात बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, मनीष संकपाळ हे गस्त घालत होते. त्यावेळी परमार मालधक्का परिसरात थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.त्याच्याकडून पिस्तूल आणि मॅगझीन जप्त करण्यात आले. परमारने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याला पिस्तूल कोणी दिले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, सहायक फौजदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, राजू धुलगुडे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×