Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

‘जीएसटी’च्या यशस्वी अंमलबजावणीत सनदी लेखापालांची भूमिका महत्त्वपूर्ण

'जीएसटी'च्या यशस्वी अंमलबजावणीत सनदी लेखापालांची भूमिका महत्त्वपूर्ण

प्रधान मुख्य आयुक्त मयांक कुमार यांचे प्रतिपादन

marathinews24.com

पुणे – भारतात वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीत सनदी लेखापालांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी कौन्सिल सातत्याने ‘जीएसटी’ कायद्यात बदल करीत आहे. सनदी लेखापालांना हे नवे बदल समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा उपयुक्त ठरतात,” असे प्रतिपादन सेंट्रल जीएसटी अँड कस्टम्स पुणे विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मयांक कुमार यांनी केले.

पुणे प्रेस क्लबच्या उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – सविस्तर बातमी 

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी अँड इन्डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आणि आयसीएआय पुणे शाखेच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंगळवारी मयांक कुमार यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट्स येथे झालेल्या कार्यक्रमावेळी जीएसटी कमिटीचे व्हाईस चेअरमन सीए उमेश शर्मा, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे, सीए राजेश अग्रवाल, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार व्यासपीठावर, तर आयसीएआय पुणेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए नंदकुमार कदम, सीए हृषिकेश बडवे, सीए प्रितेश मुनोत आदी सभागृहात उपस्थित होते.

‘जीएसटी’सारख्या महत्त्वपूर्ण विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आयसीएआय पुणे शाखेचे अभिनंदन करून मयांक कुमार म्हणाले की, जीएसटी कौन्सिल दर महिन्याला आढावा घेऊन कायद्यात आवश्यक बदल करत आहे. अलीकडे जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात होत असल्याने कर आकारणीत बदल केले आहेत. परिणामी लघू व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना व करदात्यांना दिलासा मिळाला आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये (आयटीसी) गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीए हे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे आहेत. जीएसटी अधिक सुलभ होण्यासाठी, अर्थसंकल्पात योग्य तरतुदी करण्यासाठी सनदी लेखापाल शिफारशी करतात. देशाची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, करदात्यांना चांगल्या पद्धतीने करभरणा करता यावा, यासाठी सीए परिश्रम घेतात. त्यांच्या ज्ञानवर्धनासाठी संस्थेमार्फत नियमितपणे विविध उपक्रम राबविण्यात येतात.”

सीए उमेश शर्मा म्हणाले, “एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान आपल्याला कार्यसिद्धी कडे घेऊन जाते. त्यामध्ये तज्ज्ञ होता येते. जीएसटी सातत्याने बदल होत आहेत. ही प्रणाली अधिक प्रभावी होण्यासाठी हे नवनवीन बदल जाणून घ्यायला हवेत, या उद्देशाने अशा परिषदांना अधिक महत्त्व आहे. तर सीए रेखा धामणकर, सीए राजेश अग्रवाल, सीए अभिषेक धामणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सीए सचिन मिणियार यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सीए सारिका दिंडोकर यांनी सूत्रसंचालन केले. सीए नेहा फडके यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×