Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजर

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात १० जुलै रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार हरिनामाचा सांगीतिक सोहळा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील भक्ती, अध्यात्म आणि सांगीतिक वारशाचा जागर करणारा ‘विठू माऊली – गजर हरीनामाचा, सोहळा विठुरायाचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, थं क्रिएटिव्ह, पर्यावरण दक्षता कृती मंच (निसर्गवारी) आणि सुरांजली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

पुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागे – सविस्तर बातमी

आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून विठ्ठलभक्ती, हरिनाम संकीर्तन आणि अभंग परंपरेचा सांगीतिक उत्सव रसिकांना अनुभवता येणार आहे. संतपरंपरेतील भक्तिरसाने नटलेली गीते, अभंग आणि हरिनामाचा गजर यांद्वारे विठुरायावरील अखंड श्रद्धा आणि वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक परंपरा प्रभावीपणे साकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात वारकरी संप्रदायाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी अभंग, कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता, मानवता आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख समृद्ध केली असून, त्याच संतपरंपरेचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

‘विठू माऊली’ हा कार्यक्रम केवळ भक्तिसंगीताचा आस्वाद देणारा नसून, महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी नव्या पिढीला जोडणारा उपक्रम आहे. भक्ती, संस्कृती आणि संगीत यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमातून वारकरी संप्रदायाची जीवनमूल्ये, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम मा. अॅड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच मा. डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे तसेच संतपरंपरेतील मूल्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, थं क्रिएटिव्ह, पर्यावरण दक्षता कृती मंच (निसर्गवारी) आणि सुरांजली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. विठ्ठलभक्ती, वारकरी परंपरा आणि भक्तिसंगीताचा समृद्ध वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच अध्यात्म, सांस्कृतिक मूल्ये आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जनमानसात अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी, वारकरी, कला रसिक तसेच नागरिकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×