Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

‘पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आराखडा करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाला गती द्यावी

‘पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आराखडा करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाला गती द्यावी

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

marathinews24.com

पुणे – पुणे आर्थिक क्षेत्राचा ‘पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आर्थिक बृहत् आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणाला गती द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. सर्व संबंधित शासकीय विभाग, यंत्रणा तसेच खासगी क्षेत्र, औद्योगिक विभागांसमवेत कार्यशाळा आयोजित करून त्यातील निष्कर्षानुसार आराखडा तयार करावा, अशा असेही निर्देश त्यांनी दिले.

बसथांबे ते महापालिका इमारती… सौर ऊर्जेतून पुणे होणार हरित शहर – सविस्तर बातमी 

‘पुणे महानगर ग्रोथ हब’ बाबत विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, आयएसईजीचे संचालक शिरीष संखे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), पीआयसीचे अभय पेठे, महेश देवधर तसेच मॅकेन्झी ॲण्ड कंपनीचे प्रतिनिधी व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे आर्थिक क्षेत्राला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नीती आयोगाने ‘ग्रोथ हब’ उपक्रमात पुणे महानगर प्रदेशाचा समावेश केला आहे. त्याअंतर्गत प्रारूप बृहत आर्थिक विकास आराखडा तयार करून राज्य शासनाला सादर करायचा आहे. त्यादृष्टीने पुणे व परिसरातील सध्याच्या आर्थिक क्षमता, उपलब्ध सुविधा, परिसराची बलस्थाने आदींची माहिती जमा करतानाच भविष्यातील आव्हाने, सुधारणा अपेक्षित असणाऱ्या बाबी यांची माहिती जमा करून सर्वंकष आराखडा तयार करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

उद्योग विभाग, महानगरपालिका, कौशल्य विकास व नाविन्यता विभाग, पर्यटन विभाग आदी शासकीय विभाग तसेच खासगी क्षेत्रातील औद्योगिक उत्पादन क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान उद्योग, अन्न प्रक्रिया क्षेत्र आदींशी चर्चा करुन माहिती जमा करण्याचे काम आयएसईजी व मॅकेन्झी ॲण्ड कंपनी या संस्था करत आहेत. या क्षेत्रांबरोबर कार्यशाळा आयोजित कराव्यात अशा सूचना देऊन उर्वरित शासकीय संस्थांची माहिती जमा करण्यासाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, पुणे ग्रोथ हब बृहत आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने विविध विभागांशी समन्वयासाठी विभागीय आयुक्तालयाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे दोन्ही सल्लागार संस्थांना सर्व ते सहकार्य करण्यात येईल.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त हर्डीकर म्हणाले, बृहत आराखडा तयार करताना एमसीसीआयए, फिक्की आदी उद्योग संघटनांसमवेत चर्चा करुन त्यांच्याही सूचना घ्याव्यात. संखे यांनी तसेच मॅकेन्झी अँड कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×