Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पुण्यात यल्लम्मा देवीचा मुकुट चोरणारा गजाआड

लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवडा परिसरातील यल्लम्मा देवीच्या मंदिरातून चांदीचा मुकुट चोरट्याला अवघ्या २४ तासात पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चांदीचा मुकुट हस्तगत केला. शिवराम पापा काळे (४७, रा. सुरक्षानगर, येरवडा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

धारूर घाटात ऑइल गळतीमुळे अपघातांची मालिका – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात शुक्रवारी (दि. २०) चोरट्याने यल्लम्मा देवीचा ७०० ग्रॅम वजनाचा १ लाख ८४ हजार रुपयांचा चांदीचा मुकुट चोराने
चोरून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तांत्रिक तपासासह अन्य ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शिवराम काळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच मुकुट चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून चांदीचा मुकुट देखील पोलिसांनी हस्तगत केला. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार यांच्यासह पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×