सायबर चोरट्याकडून जेष्ठासह तरुणाची फसवणूक
marathinews24.com
पुणे – गुंतवणूकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जेष्ठाची १८ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ८ फेबु्रवारी ते ६ मार्च कालावधीत अरणेश्वरमध्ये घडली आहे. याप्रकरणी उल्हास गोडसे (वय ६७) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीतून मशीनसह सव्वा ३ लाखांचे साहित्य चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गोडसे हे अरणेश्वरमध्ये राहायला असून, ८ फेबु्रवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांच्यासोबत गप्पा मारून विश्वास संपादित करीत त्यांचे अकांउट बनविले. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार सायबर चोरट्यांनी गोडसे यांना वेगवेगळ्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. १८ लाख रूपये वर्ग केल्यानंतरही त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. मात्र, संशय आल्यामुळे त्यांनी संबंधिताकडे परतावा देण्याची मागणी केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.
पार्टटाईम जॉबच्या नावाखाली २७ लाख ५२ हजारांची फसवणूक
पार्टटाईम जॉब मिळवून देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २७ लाख ५२ हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १२ मार्च २०२४ मध्ये घडली आहे. याप्रकरणी तक्रार अर्जानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरूण कोंढव्यातील मलिकनगरमध्ये राहायला असून, १२ मार्च २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना टेलीग्रामवर संपर्क केला. पार्टटाईम जॉबच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तरूणाला टास्क पुर्ण करण्यास सांगितले. त्याच्याकडून गुंतवणूकीच्या नावाखाली २७ लाख ५२ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली. पोलीस निरीक्षक अब्दुल रौफ शेख तपास करीत आहेत.