महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पिंपरी – खेड तालुक्यातील निघोजे येथे महिंद्रा कंपनीत एका व्यक्तीने चोरी केली. कंपनीतून एक लाख रुपये किमतीच्या बॅटरी केबल चोरून नेल्या. पोलिसांनी व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. आकाश राजाराम डोंगरे (२९, आळंदी, खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश चंद्रकांत बाबर (४२, मोशी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोटारीची पाठीमागून टेम्पोला धडक; दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने निघोजे येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख चार हजार १९० रुपये किमतीच्या बॅटरीच्या केबल त्याने चोरी केल्या. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
बेकायदेशीरपणे गॅस साठा केल्याबाबत दोघांना अटक
पिंपरी – बेकायदेशीरपणे लोकवस्ती मध्ये गॅस साठा करून ठेवल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. खेड तहसील कार्यालयाकडून बुधवारी सकाळी महाळुंगे इंगळे गावात ही कारवाई करण्यात आली. रोहन मोहन कोरके (२२), ऋषिकेश रामचंद्र जावळे (२७, महाळुंगे इंगळे, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक अधिकारी महादेव अर्जुन कुंभार (४०) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीरपणे त्यांच्या गॅस रिफिलिंग दुकानात गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवला. खेड तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये एक वाहन आणि गॅस सिलेंडर असा एकूण दोन लाख सात हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.



















