कोथरूडमध्ये जेष्ठाच्या गळ्यातीन सोन्याची चैन हिसकावली

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी संबंधिताच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. ही घटना १५ मार्चला सकाळी सव्वा सहाच्या सुमारास कोथरूडमधील मयूर कॉलनीतील श्री निकेतन सहकारी गृहरचना संस्था गल्ली क्रमांक दोनमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसमध्ये शिरताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, १५ मार्चला सकाळी सहाच्या सुमारास मयूर कॉलनीतील रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी तक्रारदाराला अडवले. त्यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची चैन हिसकावून चोरटे सुसाट पसार झाले. जेष्ठाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार निघून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी धाव घेतली. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या दुचाकीच्या क्रमांकाद्वारे माग काढला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×