बसमध्ये शिरताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

बसमध्ये शिरताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी ९० हजार रूपयांची सोन्याची बांगडी चोरली

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ९० हजार रूपयांची सोन्याची बांगडी कापून नेली आहे. ही घटना १३ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगरमधील एसएसपीएमएस कॉलेजजवळील बसस्थानकानजीक घडली आहे. याप्रकरणी संगमवाडीत राहणार्‍या ५४ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टास्कच्या नावाखाली तरूणाला ५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला संगमवाडीत राहायला असून, १३ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास एसएसपीएमएस कॉलेजजवळील बसस्थानकात थांबल्या होत्या. काही वेळानंतर बस आल्यानंतर तक्रारदार महिला बसमध्ये प्रवेश करीत असताना गर्दी झाली. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ९० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी कापून नेली. हातात बांगडी न दिसल्यामुळे महिलेने आरडाओरड करीत बस थांबवली. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार घोटकुले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×