अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात वाहतूक बदल

अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात वाहतूक बदल

गुरवारी पहाटे पाचनंतर अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत वाहतूक बदल

marathinews24.com

पुणे – अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. गुरवारी पहाटे पाचनंतर अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीन गुंड तडीपार – सविस्तर बातमी 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून ऋषीपंचमीनिमित्त गुरुवारी पहाटे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माेठ्या संख्येने महिला भाविक सहभागी होतात. यापार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (जिजामाता चौक ते रामेश्वर चौक), अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरातील विजय मारुती चौक ते बेलबाग चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी गणेश रस्ता, फडके हौद चौक, देवजीबाबा मंदिर चौकातून उजवीकडे वळून महाराणा प्रतापसिंह रस्ता, हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून मंडईतील गोटीराम भैय्या चौकातून स्वारगेटकडे जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौकमार्गे बाजीराव रस्ता, फुटका बुरुज चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी रस्ता, जिजामाात चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक ते सोन्या मारुती चौक दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून बोहरी आळी, मिर्झा गालिब चौकमार्गे, नेहरु चौक, गोटीराम भैय्या चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×