Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पुण्यात प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या

पुण्यात प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या

आत्महत्यापुर्वी लिहून ठेवली सुसाईड नोट

marathinews24.com

पुणे – प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना प्रभात रस्त्यावर असलेल्या लॉजमध्ये घडली आहे. गुडघ्याच्या आजरापणामुळे त्यांनी आत्महत्या केली असून, आत्महत्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यामध्ये कोणाला दोष देऊ नये, वैयक्तिक कारणातून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. सुरज मराठे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक शिक्षणाकरिता सामूहिक बांधिलकी महत्त्वाची- सचिव तुकाराम मुंढे – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज मराठे हे मुळचे खेड तालुक्यातील आळंदी येथील होते. ते स्पर्धा परिक्षेतून पोलीस दलात भरती झाले होते. दोन वर्षांचा प्रशिक्षणार्थी सेवा पुर्ण केल्यानंतर त्यांची नेमणूक सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिस ठाण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. सध्या ते तासगाव पोलिस ठाण्यात कर्तव्यास होते. दरम्यान, तासगाव पोलिस ठाण्यातून ते मेडिकल रजेवर होते. त्यांना ट्रेनिंगपासूनच गुडघ्याचा त्रास होता. पुण्यात त्याची ट्रिटमेंट होती. ३० डिसेंबर २०२५ पासून ते पुण्यातील घरी होते. दरम्यान, ६ जानेवारीला त्यांनी प्रभात रोडवर असलेल्या लॉजमध्ये बुकिंग केले होते.

राहण्यासाठी ते लॉजमध्ये गेले. मात्र, सकाळी ते बाहेर पडले नाही. बुधवारी दि.७ कामगारांनी पाहणी केली असता त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी कोणाला दोष देऊ नये, वैयक्तिक कारणातून हे पाऊल उचलले असल्याचे म्हंटले आहे. अधिक तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×