Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

सारसबागेतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण; सावरकरांच्या राष्ट्रभक्ती व अखंड भारताच्या विचारांचा गौरव

marathinews24.com

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन, पुणे आणि विश्व हिंदू जागृती फाऊंडेशन, हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील सारसबाग येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

पुणे ग्रँड टूरकडून सायकलिंग समुदायासाठी अधिकृत नोंदणीचे आवाहन – सविस्तर बातमी 

या वेळी प्रखर हिंदुत्ववादी व सावरकरांच्या विचारांचे पाईक असणारे अ‍ॅडव्होकेट व सीए  सर्वेश मेहेंदळे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास  प्रशांत टिकार, फाउंडेशनचे पदाधिकारी  प्रीतम थोरवे व  नयन ठाकूर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम, स्वातंत्र्यासाठीचा त्याग, क्रांतिकारक कार्य व अखंड भारताची संकल्पना यांचा गौरव केला. सावरकरांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून राष्ट्रहितासाठी त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत सर्वेश मेहेंदळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×