Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

वानवडीत तरूणाला लुटणार्‍या दोघांना अटक

वानवडी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – मोबाइलवर बोलत थांबलेल्या तरूणाला अडवून त्याला फोन मागून लुटमार करणार्‍या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २८ जूनला रात्री पावणे अकराच्या सुमारास सोपानबाग परिसरातील वीर भद्रेश्वर मंदीराजवळ घडली आहे. आदेश बाळू शिंदे (वय २३) आणि प्रशिक दीपक शीतेळे ( वय १८, दोघे रा. भीमनगर, शिर्वे कंपनी रोड, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसरमधील तरूणाने फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात वेगवेगळ्या भागात घरफोडी; लाखोंचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हडपसरमध्ये राहायला असून, २८ जूनला रात्री साडेदहाच्या सुमारास तो वीर भद्रेश्वर मंदीराजवळ मोबाइलद्वारे दुसर्‍याशी संवाद साधत थांबला होता. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी त्याला मोबाइल मागितला. मात्र, तक्रारदाराने मोबाइल देण्यास नकार दिला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना दोन्ही हातांनी पकडून ७०० रूपयांची रोकड, मोबाइल, घड्याळ असा १३ हजार ७०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तक्रार दाखल होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींचा माग काढून त्यांना अटक केले. पोलीस उपनिरीक्षक काजल यादव तपास करीत आहेत.

मठातून महिलेची ऐवजाची बॅग चोरीला

शहरातील मध्यवर्ती अप्पा बळवंत चौकात असलेल्या शंकर महाराज मठातून महिलेची बॅग चोरून नेण्यात आली आहे. बॅगेत ५ हजारांची रोकड, सोन्याचे मंगळसूत्र, महत्वाची कागदपत्रे असा ३० हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना २५ जूनला रात्री पावणेनउच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी येरवडा परिसरातील महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवडा परिसरात राहायला असून, २५ जूनला कामानिमित्त मध्यवर्ती अप्पा बळवंत चौकात गेली होती. त्यानंतर महिला शंकर महाराज मठात गेली होती. त्यांनी बॅग बाजूला काढून ठेवल्याची संधी साधून चोरट्यांनी ऐवजाची पिशवी चोरून नेली. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अमलदार मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×