Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

ताडीवाला रस्ता परिसरात दोन गटात मारमारी

बंडगार्डन पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून दोन गटात मारामारी झाल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्ता येथे घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

कोथरूडमध्ये तिघांना मारहाण – सविस्तर बातमी

प्रायव्हेट रोड येथे २५ जानेवारी रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी किरकोळ कारणावरुन दोन गटात मारामारी झाली. आरोपींनी जेवणासाठी ठेवलेल्या खुर्च्या, ताटे फेकून दिली. याबाबत अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेेशन) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोनू काळे, दस्तूर नदाफ, गणेश काळे, रफीक नदाफ, इस्माइल नदाफ, साहिल नदाफ, भूषण भंडारी (सर्व रा. प्रायव्हेट रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी किरकोळ वादातून घरातील महिलांना मारहाण केली. अजय याचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केली, असे भालशंकर याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.

अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) याने परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, आम्रपाली अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, दीपाली, रुपाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रायव्हेट रोड परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्याचा मित्र भूषण भंडारी याला मारहाण केली. गीता घाटे यांना मारहाण करण्यात आली, असे काळे याने फिर्यादीत म्हटले आहे.

रिक्षा चालकाकडून मोटार चालकाला मारहाण

रिक्षा चालकाने मोटारचालकाल मारहाण केल्याची घटना वारजे माळवाडी भागात घडली. या प्रकरणी रिक्षाचालक अनंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणपती महादेव कांबळे (वय ५७, रा. सिद्धार्थ चौक, रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्याथ फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती कांबळे यांनी रामनगर परिसरात मोटार लावली होती. त्या वेळी आरोपी रिक्षाचालकाने मोटारीच्या मागे रिक्षा लावली. रिक्षाने मोटारीला धडक दिली. कांबळे यांनी रिक्षाचालकाला जाब विचारला. तेव्हा आरोपीने कांबळे यांना शिवीगाळ करुन फळीने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×