वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार

वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार

हडपसरमधील मांजरी भागातील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून दोन तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना हडपसरमधील मांजरी भागात घडली. याप्रकरणी प्रेम परकाळे, धैर्यशील आखाडे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल हनुमंत सोनवणे (वय २४, रा. कुंजीर वस्ती, मांजरी, हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत साेनवणे याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.’

पर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (६ जून) रात्री नऊच्या सुमारास सोनवणे मांजरी परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. तू आदित्य मुसळेबरोबर भांडणे का केली ? अशी विचारणा करुन त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी सोनवणे आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक डिगोळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×