ऑन ड्यूटी नशेत धिंगाणा; पुण्यात दोघे पोलीस तडकाफडकी निलंबित

पुण्यात दंडात्मक कारवाईऐवजी पैसे उकळले दोन वाहतूक पोलीस निलंबित

काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांचे निलंबन

marathinews24.com

पुणे – ऑन ड्यूटी दारूच्या नशेत वावरणाऱ्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. एकाने भरती प्रक्रियेसारख्या संवेदनशील बंदोबस्तात मद्यप्राशन करून धिंगाणा घातला, तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच नशेत गाडी चालवत महिला तक्रारदाराला उडवले. या दोन्ही हवालदारांच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्यांना निलंबित केले.

पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार, टोळके ताब्यात – सविस्तर बातमी 

सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पहिली घटना २१ मार्च रोजी लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी) विद्यापीठात घडली. शहर पोलिस भरती २०२४-२५ ची लेखी परीक्षा सुरू होती. तेव्हा हवालदार सचिन जाधव यांची नियुक्ती इमारत क्रमांक १ मधील सेक्टर १ च्या बंदोबस्तासाठी केली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी बंदोबस्ताची अचानक पाहणी केली. तेव्हा जाधव हे कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन करताना आढळले. संशय आल्याने त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली, ज्यात त्यांनी मद्यार्क सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

तर, दुसरी घटना ९ मार्च रोजी घडली आहे. पोलिस हवालदार संजय कराड उंड्री पोलिस चौकीत ड्युटी अंमलदार म्हणून कार्यरत असताना कराड दुपारी दोन वाजता आपले कर्तव्य सोडून दुचाकीवरून काळेपडळ पोलिस ठाण्याच्या आवारात आले. यावेळी मद्याच्या नशेत त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी पोलिस ठाण्यातील बाकड्यावर बसलेल्या एका महिला तक्रारदाराला धडक दिली. या धडकेत महिला किरकोळ जखमी झाली. त्यानंतर शुद्धीवर नसलेल्या कराड यांनी तेथील लोकांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कृत्य ‘महाराष्ट्र नागरी सेवेचे (वर्तणूक) उल्लंघन करणारे आहे. त्यानुसार दोघांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×