घरी जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने थेट चोरला टेम्पो

नोकरानेच मारला डल्ला, ७ लाखांचा ऐवज चोरला

लोणावळ्यातून टेम्पो चोरट्याला अटक; वानवडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – घरी जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने आरोपीचे थेट टेम्पो चोरून नेला होता. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ३२० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून अडीच लाख रूपये किंमतीचा टेम्पो जप्त केला आहे. गणेश शंकर पवार (वय २५ रा. कैलासनगर, लोणावळा असे अटक केलेल्याचे नाव आहे.

नवले पुलावर पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकून मोटार उलटली – सविस्तर बातमी

रामटेकडी परिसरातून चोरट्याने मिनी टेम्पोची चोरी केल्याची घटना २३ ऑगस्टला घडली होती. याप्रकरणी शाहरूख शेख याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने पथकाने घटनास्थळापासून चाकणपर्यंत ३२० सीसीटीव्हींचे फुटेज तपासले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार विठ्ठल चोरमले व दिपक क्षीरसागर यांना २३ नोव्हेंबरला लोणावळ्यातील वैâलासनगरात टेम्पो असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्रीच्या सुमारास आडबाजुस थांबुन पथकाने टेम्पोवर लक्ष केंद्रीत केले. त्यावेळी एकजण येउन टेम्पो नेण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी गणेश पवार याला ताब्यात घेत चौकशी केली असता, तीन महिन्यापुर्वी त्याने साथीदार श्रावण वाघमारे (रा. लोणावळा रेल्वे स्टेशन परिसर) सोबत हडपरमध्ये फिरत असल्याचे सांगितले. त्यांना घरी परत जाण्यास वाहन नसल्याने दोघांनी रामटेकडीतून टेम्पो चोरल्याची कबुली दिली. टेम्पोचा वापर भंगार वेचण्यासाठी करीत असल्याचे सांगितले. पाहिजे आरोपी श्रावण वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहेत. ही कामगिरी उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, एपीआय उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×