Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; – आमदार रोहित पवार यांची मागणी

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; - आमदार रोहित पवार यांची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास चुकीच्या पद्धतीने

marathinews24.com

पुणे – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. हा तपास योग्य दिशेने होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डा णमंत्री राम मोहन नायडू यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.

अखेर अझरुद्दीन शेखला अटक; तलाठी मारहाण, जातीवाचक शिवीगाळ प्रकरण – सविस्तर बातमी 

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी जीडीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन) आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आ. रोहित पवार यांनी मुंबई आणि बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग हे तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्याशी संबंधित असून त्यांच्या कंपनीला चंद्राबाबूंनी आर्थिक रसद पुरवली आहे. तसेच चंद्राबाबूंच्याच पक्षाचे खासदार राम मोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहे. विमान अपघात झाल्यानंतर राम मोहन नायडू यांनी विमानाची तपासणी योग्य पद्धतीने झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता व्हीएसआर कंपनीच्या विमानात दोष असल्याचे जीडीसीएने जाहीर करत पाच विमानांवर कारवाई केली आहे. यावरून विमान कंपनीच्या मालकास कोणी तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे स्पष्ट होते. याचा तपास चुकीच्या दिशेने केला जात आहे. हा तपास निस्पक्षपातीपणे होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांनी राजिनामा द्यावा. तसेच तेलगु देसम पक्षाच्या कोणत्याही नेत्याला हे मंत्रालय देऊ नये. विमान कंपनीच्या भाजपच्या काही नेत्यांचाही संबंध आहे, त्यामुळे ते मला लक्ष करत आहेत, असेही पवार म्हणाले.

विमान अपघातास जीडीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन) आणि व्हीएसआर कंपनी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहोत. गुन्हा दाखल केला जात नसल्याने हा घातपात असल्याची संका येत आहे. गुन्हा दाखल व्हायला हवा, मात्र तो आम्ही दाखल करून घेऊ शकत नाही, समजून घ्या असे पोलिस म्हणतात. अपघाताचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर सीआयडीच्या हातात काही रहात नाही. सीबीआयचे अधिकारी महाराष्ट्र आणि अजित पवार यांना कितपत ओळखतात, माहिती नाही. त्यामुळे आम्ही एफआयआर नोंदवू घ्या, अशी मागणी करत आहोत. भाजप नेते सुशांतसिंग यांच्यासाठी कपडे काढून रस्त्यावर उतरत होते. मात्र, त्यांचेच मित्र असलेले अजित पवार यांच्या मृत्यूची फिर्याद नोंदवून घेत नाहीत. सत्तेतीलच काही लोक फिर्याद नोंदवण्यास आडकाठी आणत आहे. पोलिसांनी आणि सीआयडीने गुन्हा दाखल करून घेतला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा ईशाराही यावेळी रोहित पवार यांनी दिला.

सुनेत्रा पवार यांना बिनविरोध आमदार करावे

उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. बारामती विधान सभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकी यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने उभे राहू नये, त्यांची निवड बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली. घराची व ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, आम्हाला अजित दादांवनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्या बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. कोणाच्या घरातील कामाची बिले आणि कोणाच्या ब्युटी पार्लरची बिले पक्षाच्या खात्यातून देण्यात आली आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×