हॉटेल व्यावसायिकाचा बेशिस्तपणा अंगलट, हॉटेल युनिकॉर्न हाऊस येरवडा पोलिसांनी केले सील
Marathinews24.com
पुणे- हॉटेल व्यावसायिकाकडून सातत्याने नियमभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कल्याणीनगरमधील हॉटेल युनिकॉर्न हाऊस येरवडा पोलिसांनी सील केले. ११ एप्रिलला मध्यरात्री एकच्या सुमारास हॉटेल परिसरात काही जणांमध्ये वादावादी झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, वादावादीच्या घटनांना आळा बसाविण्यासाठी पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.
हॉटेल युनिकॉर्न हाऊस ११ एप्रिलला रात्रीच्या सुमारास बंद असल्याचे दिसून आले होते. आतमध्ये साफसफाई सुरू असल्याचे आढळून आले. दरम्यान, यापूर्वीही संबंधित हॉटेल विरोधात दोन गुन्हे दाखल असून १० खटले दाखल आहेत. वादावादी प्रकरणी कोणाचीही तक्रार नसली तरी, येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ त्या कलम १४२ (२) अन्वये हॉटेल युनिकॉर्न सील केले आहे. दरम्यान, येरवडा परिसरात हॉटेल व्यावसायिकांसह बिअर बार रेस्टो मालकांनी पोलिसांवर शिरजोरी करण्यास पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. त्यामुळे मध्यरात्री एक वाजेनंतरही डीजेचा दणदणाट, खाद्यपदार्थांची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून आले आहे.
गॅस कनेक्शन बंदीच्या नावाखाली सायबर फसवणूक, ८९ हजारांची लूट – सविस्तर बातमी
हॉटेलमध्ये महिला बाउंसरच्या विनयभंगाची घटना ताजी
येरवडा परिसरात डीजेचा कानठळ्या बसविणार्या आवाजापुढे नागरिक हतबल असल्याचे सांगितले आहे. मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास डान्स फ्लोअरवर नाचणार्या तरूणांनी तरूणींना धक्का मारून अश्लील वर्तन केले. त्यांना समजावून सांगताना संबंधितांनी महिला बाउंसरचा विनयभंग केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येरवड्यातील हॉटेल किंग्ज फुडज अॅण्ड ब्रेवरेजस २३ मार्चला रात्री पावणेएक वाजेपर्यंत डान्स फ्लोअर सुरू होता. त्यावेळी अनेक तरूणी-तरूणी डान्स करीत होते. त्यावेळी एकजण डान्स करताना मुलींना धक्का लागत होता. त्यामुळे महिला बाउंसरने संबंधिताला बाजूला डान्स करण्यास बजाविले होते. मात्र, त्याने न करता त्याठिकाणी डान्स करीत मुलींची छेड काढण्याच्या दृष्टीने डान्स करीत राहिला. त्यामुळे महिला बाउंसरने त्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करीत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी गणेश दादाभाउ घावटे (वय ३४, रा. अण्णापूर, शिरूर ) आणि यश कोतवाल (रा. कोरेगाव भीमा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.